॥ श्रीराम ॥

श्री मनाचे श्लोक

श्री समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक ५३ सदा आर्जवी प्रीय जो सर्व लोकीं

सदा आर्जवी प्रीय जो सर्व लोकीं। सदा सर्वदा सत्यवादी विवेकी॥ न बोले कदा मिथ्य वाचा त्रिवाचा। जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥

॥ ५३ ॥

मनाचे श्लोक ५३ अर्थ — मराठी

जो सदा सरळ स्वभावाचा आणि सर्व लोकांना प्रिय आहe, जो सदैव सत्यवादी आणि विवेकी आहे, जो कधीही असत्य बोलत नाही, तो सर्वोत्तमाचा दास जगात धन्य होय.

Manache Shlok 53 Meaning — English

One who is ever upright and dear to all, always truthful and discerning, who never speaks falsehood — that servant of the Supreme is blessed in the world.