नको वासना वीषयीं वृत्तिरुपें। पदार्थी जडे कामना पूर्वपापें॥ सदा राम निष्काम चिंतीत जावा। मना कल्पनालेश तोहि नसावा॥
॥ ५८ ॥मनाचे श्लोक ५८ नको वासना वीषयीं वृत्तिरुपें
मनाचे श्लोक ५८ अर्थ — मराठी
वृत्तिरूपाने विषयांची वासना धरू नकोस; पूर्वपापांमुळे मन पदार्थांत गुंतते. सदा निष्काम रामाचे चिंतन करावे; त्यात कल्पनेचा लेशही नसावा.
Manache Shlok 58 Meaning — English
Do not let craving for sense-objects take shape in the mind; through past sins the mind clings to things. Ever contemplate the desireless Rama, without a trace of fantasy.