॥ श्रीराम ॥

श्री मनाचे श्लोक

श्री समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक ६६ नव्हे सार संसार हा घोर आहे

नव्हे सार संसार हा घोर आहे। मना सज्जना सत्य शोधुनि पाहे॥ जनीं वीष खातां पुढे सूख कैचे। करीं रे मना ध्यान या राघवाचें॥

॥ ६६ ॥

मनाचे श्लोक ६६ अर्थ — मराठी

हा संसार सार नसून घोर आहे; हे सज्जन मना, सत्य शोधून पाहा. जगात विष खाल्ल्यावर पुढे सुख कोठले? म्हणून हे मना, या रघुनाथाचे ध्यान कर.

Manache Shlok 66 Meaning — English

This worldly life is no essence but a dread; O good mind, search out the truth. Having eaten poison, what happiness can follow? So, O mind, meditate on Raghava.