॥ श्रीराम ॥

श्री मनाचे श्लोक

श्री समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक ६७ घनश्याम हा राम लावण्यरुपी

घनश्याम हा राम लावण्यरुपी। महाधीर गंभीर पूर्णप्रतापी॥ करी संकटीं सेवकांचा कुडावा। प्रभाते मनी राम चिंतीत जावा॥

॥ ६७ ॥

मनाचे श्लोक ६७ अर्थ — मराठी

हा राम घनश्याम, लावण्यरूप, महाधीर, गंभीर आणि पूर्ण प्रतापी आहे. संकटात तो सेवकांचा कैवारी होतो; म्हणून पहाटे मनात रामाचे चिंतन करावे.

Manache Shlok 67 Meaning — English

This Rama is dark as a cloud, full of grace, deeply steadfast, grave and wholly majestic. In hardship He champions his servants; so at dawn contemplate Rama in the mind.