नको वीट मानूं रघुनायकाचा। अती आदरे बोलिजे राम वाचा॥ न वेंचे मुखी सांपडे रे फुकाचा। करीं घोष त्या जानकीवल्लभाचा॥
॥ ९१ ॥मनाचे श्लोक ९१ नको वीट मानूं रघुनायकाचा
मनाचे श्लोक ९१ अर्थ — मराठी
रघुनायकाच्या नामाचा कंटाळा करू नकोस; अति आदराने रामनाम वाणीने बोलावे. ते बोलताना काहीही खर्च होत नाही आणि फुकट सापडते; म्हणून त्या जानकीवल्लभाचा घोष कर.
Manache Shlok 91 Meaning — English
Do not tire of Raghava's name; utter it with deep reverence. It costs nothing to speak and is found for free; so raise the chant of Janaki's beloved.