॥ श्रीराम ॥

श्री मनाचे श्लोक

श्री समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक ९२ अती आदरें सर्वही नामघोषे

अती आदरें सर्वही नामघोषे। गिरीकंदरी जाइजे दूरि दोषें॥ हरी तिष्ठतू तोषला नामघोषें। विशेषें हरामानसीं रामपीसें॥

॥ ९२ ॥

मनाचे श्लोक ९२ अर्थ — मराठी

अति आदराने सर्वांनी नामघोष करावा, म्हणजे गिरिकंदरांतही दोष दूर जातात. नामघोषाने हरी संतुष्ट होऊन राहतो; विशेषतः शंकराच्या मनात रामाचे पिसे (प्रेम) आहे.

Manache Shlok 92 Meaning — English

Let all chant the name with deep reverence, so that even in the mountain caves sins are driven far. Hari abides pleased by the chant; and Shiva above all is enraptured with love for Rama.