तिन्ही लोक जाळुं शके कोप येतां। निवाला हरु तो मुखे नाम घेतां॥ जपे आदरें पार्वती विश्वमाता। म्हणोनी म्हणा तेंचि हे नाम आतां॥
॥ ९४ ॥मनाचे श्लोक ९४ तिन्ही लोक जाळुं शके कोप येतां
मनाचे श्लोक ९४ अर्थ — मराठी
कोप आला तर जो तिन्ही लोक जाळू शकतो, तो (शंकर) नाम घेताच शांत होतो. विश्वमाता पार्वतीही आदराने ते जपते; म्हणून तेच नाम आता तुम्ही म्हणा.
Manache Shlok 94 Meaning — English
He who in wrath could burn the three worlds (Shiva) is calmed the moment he takes the name. Parvati, mother of the universe, also repeats it reverently; so utter that very name now.