॥ श्रीराम ॥

श्री मनाचे श्लोक

श्री समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक ९५ अजामेळ पापी वदे पुत्रकामे

अजामेळ पापी वदे पुत्रकामे। तया मुक्ति नारायणाचेनि नामें॥ शुकाकारणे कुंटणी राम वाणी। मुखें बोलतां ख्याति जाली पुराणीं॥

॥ ९५ ॥

मनाचे श्लोक ९५ अर्थ — मराठी

अजामेळ पापी मुलाच्या नामाने (नारायण) हाक मारतो आणि नारायणाच्या नामाने त्याला मुक्ती मिळते. शुकासाठी कुंटणीने रामनाम उच्चारले आणि तिचीही ख्याती पुराणात झाली.

Manache Shlok 95 Meaning — English

The sinner Ajamela called out his son's name (Narayana), and by Narayana's name he gained liberation. A fallen woman taught a parrot to say Rama's name, and even she became renowned in the Puranas.