॥ श्रीराम ॥

श्री मनाचे श्लोक

श्री समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक ९८ हरीनाम नेमस्त पाषाण तारी

हरीनाम नेमस्त पाषाण तारी। बहु तारीले मानवी देहधारी॥ तया रामनामीं सदा जो विकल्पी। वदेना कदा जीव तो पापरूपी॥

॥ ९८ ॥

मनाचे श्लोक ९८ अर्थ — मराठी

हरिनामाने नेमके पाषाणही तरले; कितीतरी देहधारी माणसे तरून गेली. त्या रामनामाविषयी जो सदा विकल्प (शंका) घेतो, तो जीव कधीही नाम न बोलणारा पापरूपीच होय.

Manache Shlok 98 Meaning — English

By Hari's name even stones were made to float, and countless embodied souls were carried across. One who ever doubts that name of Rama is a sinful soul who never speaks it.