॥ श्रीराम ॥

श्री मनाचे श्लोक

श्री समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक ९९ जगीं धन्य वाराणसी पुण्यराशी

जगीं धन्य वाराणसी पुण्यराशी। तयेमाजि आतां गतीं पूर्वजांसी॥ मुखे रामनामावळी नित्य काळीं। जिवा हित सांगे सदा चंद्रमौळी॥

॥ ९९ ॥

मनाचे श्लोक ९९ अर्थ — मराठी

पुण्याची राशी असलेली वाराणसी जगात धन्य आहे; तिथे पूर्वजांना सद्गती मिळते. तिथे चंद्रमौळी (शंकर) नित्य मुखाने रामनामावली म्हणून जिवाला सदा हित सांगतो.

Manache Shlok 99 Meaning — English

Blessed in the world is Varanasi, a treasury of merit, where ancestors attain a good destiny. There Shiva ever recites the litany of Rama's name and always counsels the soul toward its good.