॥ श्रीराम ॥

श्री मनाचे श्लोक

श्री समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक १३९ पुढें पाहता सर्वही कोंदलेसें

पुढें पाहता सर्वही कोंदलेसें। अभाग्यास हें दृश्य पाषाण भासे॥ अभावे कदा पुण्य गांठी पडेना। जुने ठेवणे मीपणे आकळेना॥

॥ १३९ ॥

मनाचे श्लोक १३९ अर्थ — मराठी

पुढे पाहता सर्व काही (आत्मतत्त्वाने) भरलेले आहे, पण अभाग्याला हे दृश्य पाषाणासारखे भासते. भाव नसल्याने पुण्य गाठीशी पडत नाही; 'मी'पणामुळे ते जुने ठेवणे आकळत नाही.

Manache Shlok 139 Meaning — English

Look ahead — all is filled with the Self, yet to the luckless this world appears as lifeless stone. Without feeling, no merit is stored; through 'I'-ness the ancient treasure is not grasped.