॥ श्रीराम ॥

श्री मनाचे श्लोक

श्री समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक १४० जयाचे तया चूकले प्राप्त नाहीं

जयाचे तया चूकले प्राप्त नाहीं। गुणे गोविले जाहले दुःख देहीं॥ गुणावेगळी वृत्ति तेहि वळेना। जुने ठेवणे मीपणे आकळेना॥

॥ १४० ॥

मनाचे श्लोक १४० अर्थ — मराठी

आपले असूनही ते (आत्मरूप) चुकले, प्राप्त झाले नाही; गुणांत गुंतल्याने देहाला दुःख झाले. गुणांच्या पलीकडे वृत्ती वळत नाही; 'मी'पणामुळे ते जुने ठेवणे आकळत नाही.

Manache Shlok 140 Meaning — English

Though it is one's own, the Self is missed and not attained; caught in the qualities, the body suffers. The mind does not turn beyond the qualities; through 'I'-ness the ancient treasure is not grasped.