॥ श्रीराम ॥

श्री मनाचे श्लोक

श्री समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक १५९ जेणे मक्षिका भक्षिली जाणिवेची

जेणे मक्षिका भक्षिली जाणिवेची। तया भोजनाची रुची प्राप्त कैची॥ अहंभाव ज्या मानसीचा विरेना। तया ज्ञान हे अन्न पोटी जिरेना॥

॥ १५९ ॥

मनाचे श्लोक १५९ अर्थ — मराठी

ज्याने जाणिवेची माशी गिळली (अहंकाराने ज्ञान दूषित केले), त्याला त्या भोजनाची रुची कशी लागणार? ज्याच्या मनातील अहंभाव विरत नाही, त्याच्या पोटी हे ज्ञानरूपी अन्न जिरत नाही.

Manache Shlok 159 Meaning — English

One who has swallowed the fly of conceit — how can he relish that meal? In whose mind the sense of 'I' does not dissolve, this food of knowledge is not digested.