नको रे मना वाद हा खेदकारी। नको रे मना भेद नानाविकारी॥ नको रे मना शीकवूं पूढिलांसी। अहंभाव जो राहिला तूजपासी॥
॥ १६० ॥मनाचे श्लोक १६० नको रे मना वाद हा खेदकारी
मनाचे श्लोक १६० अर्थ — मराठी
हे मना, हा खेद देणारा वाद नको; नाना विकार निर्माण करणारा भेद नको. हे मना, दुसऱ्यांना शिकवू नकोस, जोवर तुझ्यापाशी अहंभाव राहिला आहे.
Manache Shlok 160 Meaning — English
O mind, no more of this quarrel that brings grief; no more of division that breeds many distortions. O mind, do not teach others while the sense of 'I' still remains in you.