॥ श्रीराम ॥

श्री मनाचे श्लोक

श्री समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक १७५ विधी निर्मिती लीहितो सर्व भाळी

विधी निर्मिती लीहितो सर्व भाळी। परी लीहिता कोण त्याचे कपाळी॥ हरू जाळितो लोक संहारकाळी। परी शेवटी शंकरा कोण जाळी॥

॥ १७५ ॥

मनाचे श्लोक १७५ अर्थ — मराठी

ब्रह्मदेव सर्वांच्या भाळी (नशिबी) लिहितो, पण त्याच्याच कपाळी कोण लिहितो? शंकर संहारकाळी सर्व लोक जाळतो, पण शेवटी शंकराला कोण जाळतो?

Manache Shlok 175 Meaning — English

The creator writes destiny on every brow — but who writes upon his own? Shiva burns all worlds at the dissolution — but in the end, who burns Shiva?