॥ श्रीराम ॥

श्री मनाचे श्लोक

श्री समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक २२ मना सज्जना हीत माझें करावें

मना सज्जना हीत माझें करावें। रघुनायका दृढ चित्ती धरावें॥ महाराज तो स्वामि वायुसुताचा। जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा॥

॥ २२ ॥

मनाचे श्लोक २२ अर्थ — मराठी

हे सज्जन मना, माझे हित कर आणि रघुनायकाला दृढपणे चित्तात धर. तो वायुसुताचा (मारुतीचा) स्वामी महाराज आहे, तिन्ही लोकांचा नाथ असून तो लोकांचा उद्धार करतो.

Manache Shlok 22 Meaning — English

O good mind, do what is truly good for me, and hold Raghunayaka firmly in your heart. He is the great lord of the son of the wind (Maruti), master of the three worlds, who uplifts all people.