॥ श्रीराम ॥

श्री मनाचे श्लोक

श्री समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक २३ न बोलें मना राघवेवीण कांहीं

न बोलें मना राघवेवीण कांहीं। जनी वाउगें बोलता सुख नाहीं॥ घडिने घडी काळ आयुष्य नेतो। देहांतीं तुला कोण सोडूं पहातो?॥

॥ २३ ॥

मनाचे श्लोक २३ अर्थ — मराठी

हे मना, रघुनाथावाचून काहीही बोलू नकोस; जगात व्यर्थ बडबड केल्याने सुख मिळत नाही. घडीघडीने काळ आयुष्य नेतो आहे; देहाच्या अंती तुला सोडवायला कोण येईल?

Manache Shlok 23 Meaning — English

O mind, speak of nothing but Raghava; idle chatter in the world brings no happiness. Moment by moment, time carries your life away; at the body's end, who will come to save you?