रघुनायकावीण वांया शिणावे। जनासारिखे व्यर्थ कां वोसणावें॥ सदा सर्वदा नाम वाचे वसो दे। अहंता मनी पापिणी ते नसो दे॥
॥ २४ ॥मनाचे श्लोक २४ रघुनायकावीण वांया शिणावे
मनाचे श्लोक २४ अर्थ — मराठी
रघुनायकावाचून व्यर्थ का शिणावे? इतर लोकांसारखे निरर्थक का बरळावे? सदा सर्वकाळ रामाचे नाम वाणीत वसू दे, आणि पापी अहंता मनात राहू देऊ नकोस.
Manache Shlok 24 Meaning — English
Why toil in vain without Raghunayaka? Why babble uselessly like others do? Let Rama's name dwell always on your tongue, and never let sinful pride live in your mind.