मना वीट मानूं नको बोलण्याचा। पुढें मागुता राम जोडेल कैंचा॥ सुखाची घडी लोटतां सूख आहे। पुढें सर्व जाईल कांही न राहे॥
॥ २५ ॥मनाचे श्लोक २५ मना वीट मानूं नको बोलण्याचा
मनाचे श्लोक २५ अर्थ — मराठी
हे मना, रामनाम बोलण्याचा कंटाळा करू नकोस; पुन्हा पुढे राम कोठून जोडला जाईल? सुखाची घडी लोटली की तेवढेच सुख; पुढे सर्व निघून जाईल, काहीही राहणार नाही.
Manache Shlok 25 Meaning — English
O mind, do not tire of speaking Rama's name — where will you find Rama again later? Only the passing moment holds its joy; afterwards all slips away and nothing remains.