देहेरक्षणाकारणें यत्न केला। परी शेवटीं काळ घेउन गेला॥ करीं रे मना भक्ति या राघवाची। पुढें अंतरीं सोडिं चिंता भवाची॥
॥ २६ ॥मनाचे श्लोक २६ देहेरक्षणाकारणें यत्न केला
मनाचे श्लोक २६ अर्थ — मराठी
देहाचे रक्षण करण्यासाठी माणूस खूप प्रयत्न करतो, पण शेवटी काळ त्याला घेऊन जातो. म्हणून हे मना, या रघुनाथाची भक्ती कर आणि अंतःकरणातील संसाराची चिंता सोडून दे.
Manache Shlok 26 Meaning — English
A person strives hard to protect the body, yet in the end time carries him away. So, O mind, offer devotion to Raghava, and release from your heart the worry of worldly life.